rava besan barfi recipe

 


रवा बेसन बर्फी/वडी बनवायला सहज सोपी रेसिपी आहे. ही बर्फी चवीला रुचकर व स्वादिष्ट लागते. कधीही झटपट आणि कमी साहित्यात बनणारी बेसन बर्फी . त्यामुळे बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा कधीही घरी मिठाई बनवणे श्रेयस्कर ठरते. घरी बनवलेल्या बेसन बर्फीची बातच काही और असते. चला बनवूया हेल्दी आणि स्वादिष्ट  रवा बेसन बर्फी.


बेसन बर्फी साठी साहित्य :


•  एक कप बेसन

•  अर्धा कप तूप

•  १/२ कप गुळ

•  २ छोटे चमचे बारीक रवा

•  १/२ छोटा चमचा वेलची जायफळ-पावडर 

•  काजू–बदाम–पिस्ताचे काप 

 

बेसन बर्फी बनवण्याची कृती :


•  बेसन बर्फी साठी सर्वप्रथम ड्राई फ्रुट बारीक स्लाइस कापून बाजूला ठेवा.

•  गुळ बारीक कापा/ किस करून वेगळा ठेवा.

•  आता एका कढई मध्ये बेसन १ – २ मिनिट सुखच भाजुन घ्यावे. 

•  आता त्यात थोड थोड करून तूप टाकून चांगल मिक्स करून भाजुन घ्यावे.

•  साधारणत: ५ मिनिटांनी त्यात बारीक रवा टाकून चागला भाजुन घ्यावे.    

•  हे मिश्रण चांगल गोल्डन ब्राऊन रंग येवून बेसन भाजल्याचा मंद सुगंध येई पर्यत भाजावे.

•  बेसन चांगल भाजुन झाल्यावर तूप सोडायला लागेल व त्याचा टेक्चर सुधा बदलेल.

•  आता या मिश्रणावर २ छोटे चमचे पाण्याचा हपका मारा व मोठ्या चमच्याने चांगले मिक्स करून पाणी सुखे पर्यंत भाजुन घ्यावे.

•  यावर पाण्याचा हपका मारल्याने बर्फी दाणेदार व सोफ्ट होते.   

•  बेसन चांगल्याप्रकारे भाजायला साधारण १०- १५ मिनिट लागतात.

•  आता हे मिश्रण भाजुन झाल्यावर लगेच ग्यास बंद करून त्यात किसलेला गुळ व वेलची-जायफळ पावडर मिक्स करून चमच्याने सारख हलवत रहा.

•  जोपर्यत गुळ पूर्णपणे वितळून मिक्स होत नाही.

•  हे मिश्रण व कढई गरम असल्यामुळे गुळ सहज वितळतो.

•  आता एका केक करण्याच्या भांड्याला किंवा थाळीला तुपाने ग्रीसिंग करून घ्यावे.

•  हे मिश्रण गरम असतानाच ग्रीसिंग केलेल्या भांड्यात ओतून सर्व बाजूने समप्रमाणात सारखे पसरवून घ्यावे .

•  हे मिश्रण व्यवस्थित सारखे पसरवण्यासाठी एखादी सपाट बुडाची वाटीच्या तळाला तूप लावून समतल करू शकता.

•  त्यावर ड्राय फ्रुटचे काप हलक्या हाताने दाबून २ मिनिट सेट होऊ द्यावे.

•  नंतर हे मिश्रण सेट होण्या आधी गरम असतानाच सुरीच्या सहायाने (आपल्याला हव्या त्या आकारात) कट द्यावे. नाहीतर हे मिश्रण सुकल्यावर व्यवस्थित आकारात तुकडे पडणार नाहीत.    

•  साधारणत: अर्ध्या तासाने बर्फी सेट झाल्यावर पाडलेले बर्फीचे तुकडे वेग वेगळे करून हवाबंद डब्यात ठेऊन, आपल्याला हवा तेव्हा स्वादिष्ट बेसन बर्फीचा आस्वाद घेऊ शकता. 


Post a Comment

Previous Post Next Post